प्रवरेच्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नाशिक येथे कृषी निर्यात प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्यूज नेटवर्क डिजिटल मिडिया
लोणी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांची नाशिक येथील नामांकित कृषि निर्यात कंपनी ‘काल्या एक्सपोर्ट’ या ठिकाणी चार महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. अनिल बेंद्रे यांनी दिली.
कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात अंतिम वर्षात शिकणारे कु. अजिंक्य जमधडे , अविनाश झिरपे, मयूर जमधडे, शुभम मुसमाडे, तुषार काळे, विशाल सहाणे आणि रोहित अभंग या विद्यार्थ्यांची नाशिक येथील नामांकित कृषी निर्यातदार कंपनीमध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली असून या प्रशिक्षण कार्यकाळामध्ये हे विद्यार्थी शेतमाल विपणन, वर्गवारी , गुणवत्ता नियंत्रण तसेच निर्यात प्रक्रिया या विषयावर सविस्तर अभ्यास करून या विषयीचा संशोधन प्रबंध महाविद्यालयास सदर करतील. या संपूर्ण प्रशिक्षण कार्यकाळात विध्यार्थ्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील कृषी अर्थाशात्र विभागातील सहाय्यक प्रध्यापक डॉ. गोविंद जोशी, कार्यक्रम समन्वयक प्रा. संतोष वर्पे, डॉ. आशिष क्षीरसागर, प्रा. सत्येन खर्डे प्रा. शुभम मुसमाडे डॉ.काजल खंडागळे, प्रा. सारिका फरगडे, प्रा. राहुल विखे प्रा. प्रेरणा अभंग व प्रा. अश्विनी घाडगे आदि यांचे मार्गदर्शन लाभेल.
महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ शुभांगी साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, शिवार फेरी, कृषी आधारित. औद्योगिक कंपनी भेटी, कार्यानुभव उपक्रम, शेतकरी मेळावे तसेच परदेशात शिक्षणाच्या संधी या विषयावर मार्गदर्शन आदी उपक्रमाचा समावेश होतो.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खा.सुजय विखे पाटील, संस्थचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, संचालिका डॉ. शुभांगी साळोखे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल बेंद्रे यांनी अभिनंदन केले आहे.