टाकळीभान येथील आरोग्य केंद्राचे दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे बदलीचा प्रस्ताव पाठवणार, डॉ,जयश्री देशमुख
टाकळीभानला अनुभवी व सुयोग्य माणूस देण्याचे डॉ. देशमुख मॅडम यांचे ग्रामस्थांना आश्वासन
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम न्युज)
-टाकळीभान प्राथमिक आरोग्य केंद्रातील तक्रारींबाबत कोणतीही सुधारणा होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री देशमुख मॅडम यांनी दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदलीचा प्रस्ताव पाठवण्याचे दिले आश्वासन,
श्रीरामपूरच्या पूर्व भागातील सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र ओळखले जाते परंतु गेल्या काही दिवसांपासून येथील नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत, मेडिसिन उपलब्ध नसणे अधिकारी जागेवर नसणे तसेच योग्य त्या सुविधा मिळत नसल्याने मध्यंतरी आमदार लहु कानडे यांनी टाकळीभान प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली असता ग्रामस्थांनी तक्रारींचा पाढा वाचला होता. त्यावर आमदार लहु कानडे यांनी येथील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना तंबी देऊन कामकाजात सुधारणा करण्यास खडसावले होते. परंतु येथील अधिकाऱ्यावर कोणताही परिणाम झालेला दिसून येत नसल्यामुळे श्रीरामपूर तालुका आरोग्य अधिकारी यांची टाकळीभान प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ग्रामस्थ समवेत बैठक संपन्न झाली.
यावेळी येथील कामकाजाबद्दल ग्रामपंचायतचे उपसरपंच कान्हा खंडागळे व जयकर मगर, यांनी येथील परिस्थितीबाबत, अडचणींबाबत आरोग्यकारी अधिकारी यांच्या समोर कैफियत मांडली. यावेळी कान्हा खंडागळे म्हणाले की येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा दहा ते बारा खेडे गावांचा संबंध येत असून, सर्वसामान्य गोरगरीब आदिवासी नागरिक या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येथे येत असतात. त्याचप्रमाणे प्रसूती गृह सेवा ही या ठिकाणी 24 तास सुरू असते. परंतु या ठिकाणी विविध औषधांचा तुटवडा, दवाखान्याच्या परिसरात अंतर्बाह्य अस्वच्छता, अधिकारी वेळेवर न थांबणे, नवीन औषधांची डिमांड न करणे, लस्सी उपलब्ध नसणे या कारणाने उपचार घेणारे रुग्ण पाठीमागे जातात. व सर्वसामान्य नागरिक येथील सेवेच्या अभावामुळे उपचारापासून वंचित राहतात.
येथील गावातील पदाधिकारींसाठी व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांसाठी ही लाजिरवाणी बाब आहे. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी कामकाजात सुधारणा न केल्याने. टाकळीभान सारख्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अनुभवी व सुयोग्य असा अधिकारी द्यावा अशी मागणी यावेळी त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री देशमुख मॅडम यांच्याकडे केली. येथील ग्रामस्थांच्या समस्या ऐकल्यानंतर, व येथील दोन्ही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजात सुधारणा होत नसल्याने त्यांच्या बदली बाबत प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवणार असून ,आपल्याला अनुभवी व सुयोग्य माणूस देण्याचे आश्वासन बैठकी प्रसंगी डॉ. देशमुख मॅडम यांनी ग्रामस्थांना दिले.
या बैठकी प्रसंगी सरपंच सौ,अर्चनाताई रणनवरे , उपसरपंच कान्हा खंडागळे, लोकनेते भाऊसाहेब पवार अशोकचे संचालक यशवंत रणनवरे, आबासाहेब रणनवरे,ग्रा. सदस्य सौ, अर्चना पवार, सुनील बोडखे, अविनाश लोखंडे, भाऊसाहेब पटारे, शिवाजी पवार, अनिल दाभाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राम बोरुडे ग्रामसेवक रामदास जाधव आदींसह प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व आशा सेविका आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट– आरोग्य केंद्रचा क्लर्क झालेल्या खर्चाचे तपशील व बिल दाखवत नसल्यामुळे, त्याच्यावरही ग्रामस्थ नाराज होते, परंतु त्याला रिटायरमेंटला सहा महिने बाकी असलेने कारवाई टळली, त्याना कामकाजात सुधारणा करायचे संधी दिली- तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री देशमुख,