सह्याद्री लायसन्स क्लबने वाढवला मुलांच्या चेहऱ्यावर आनंद …. राजेंद्र फंड
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
राहाता (सत्तेचा महासंग्राम वृत्तसेवा)
समाजातील गरीब विद्यार्थ्यांची शाळेप्रती गोडी वाढावी, मुलांची शाळेतील विद्यार्थ्याची हजेरी वाढावी यास्तव लायन्स क्लब राहाता सह्याद्रीचे व्हॉईस प्रेसिडेंट ला. सुनील धाडगे यांच्या डायमंड जनरल यांच्या तर्फे राहाता येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चारी नंबर 15 येथील गरीब विद्यार्थ्यांसाठी 51 स्कूल बॅगचे वाटप शनिवार दिनांक 14/10/2023 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले. यावेळी क्लबचे प्रेसिडेंट ला. राजेंद्र फंड हे म्हणाले की लायन्स क्लब राहाता सह्याद्री ही सेवाभावी संस्था असून समाजपयोगी उपक्रम ते सतत राबवत असतात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 15 चारी ही वस्तीवरील शाळा असून येथे सर्व गरीब शेतकरी, शेतमजुरांची मुले शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत. त्यांची निकडीची गरज लक्षात घेवून ला. सुनील धाडगे यांनी गेल्या 5 वर्षापासून या शाळेत स्कूल बॅगचे वाटप करत असतात.या वर्षी लायन्स क्लब राहाता सह्याद्री यांना सोबत घेवून या शाळेतील गरीब 51 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप संस्थापक ला. विनोद गाडेकर, प्रेसिडेंट ला. राजेंद्र फंड, व्हॉईस प्रेसिडेंट ला. सुनील धाडगे, सेक्रेटरी ला. सागर रोकडे, ॲड. ला. सुधीर बोठे. ला. संदीप पुंड, ला. सिराज शेख, ला. बापू गायकवाड, ला. भानुदास सोनवणे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी स्कूल बॅग मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय झाला. कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे शिक्षक श्री. सुरेश नळे सर, शरद होडगर सर, विनोद तोरणे सर, दिगंबर तांदळे सर, सुनील गायकवाड सर, सुनीता चोळके मॅडम यांनी केले.