सावळीविहीर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला माजी सरपंच रमेश पाटील आगलावे यांच्याकडून एक्साइड बॅटरी भेट
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क
राहाता( प्रतिनिधी) ज्ञानेश्वर जोरे
(डिजिटल मिडिया वृत्तसेवा)
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सावळविहीर बुद्रुक तालुका राहाता या शाळेला सावळविहीर बुद्रूक गावचे माजी सरपंच रमेश पाटील आगलावे यांनी सोळा हजार पाचशे रुपयाची एक्साईड बॅटरी भेट म्हणून दिली. यावेळी लोकनियुक्त सरपंच ओमेश पाटील जपे, बाजार समितीचे संचालक शांताराम जपे, माजी उपसरपंच विकास पाटील जपे, माजी उपसरपंच गणेश कापसे, सावळविहीर केंद्राचे केंद्रप्रमुख पंकज दर्शने सर. तसेच ग्रामस्थ चंद्रकांत जमधडे, नारायण कापसे, राधू जाधव, उपस्थित होते .शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर जाधव यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच राहता तालुक्यातील एक नावाजलेली शाळा म्हणून आपली शाळा पाहिली जाते ,तसेच गुणवत्तेच्या बाबतीत प्रथम क्रमांक शाळा आहे ,मराठी शाळेत जसा मुलांचा सर्वांगीण विकास होतो, तसा इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मुलांचा सर्वांगीण विकास होत नाही. आपल्या शाळेचाआम्हाला सार्थ अभिमान वाटतो असेही माजी सरपंच रमेश पाटील आगलावे म्हणाले.
लोकनियुक्त सरपंच ओमेश पाटील जपे म्हणाले की आपल्या शाळेमध्ये मुलींचे शौचालय, पाण्याची टाकी, रनिंग वॉटर, त्याचप्रमाणे पेविंग ब्लॉकची कामे देखील प्राधान्यक्रमाने आपण करणार आहोत, तसेच अजूनही काही अडचणी असतील तर त्या ग्रामपंचायत कार्यालयास कळवाव्यात,शाळेमध्ये आजी आजोबा दिन साजरा करण्यात आला .त्यावेळी प्रमुख प्रतिष्ठित पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या पाच वर्षांपूर्वी रमेश पाटील आगलावे यांनी सावळविहीर बुद्रुक शाळेला चार्जिंग साऊंड सिस्टिम दिली होती . तीहीअजून काय अतिशय चांगल्या कंडिशन मध्ये आहे. शाळेत विविध उपक्रम पाहून ,शाळेतील वृक्ष लागवड पाहून अनेकदा दानशूर व्यक्ती शाळेत लोकवर्गणी देतात आणि त्या माध्यमातून शाळेचा विकास होतो .असेही गौरव उद्गार मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर जाधव यांनी काढले .शाळेत चालू असलेल्या विविध उपक्रमांचे माजी उपसरपंच श्री विकास पाटील यांनी कौतुक केले .संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्या गोर्डे,,रूपाली मंद्रे, सविता सानप, सुचित्रा चवाळ, संगीता याईस, सविता बर्डे यांनी परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दत्ता गायकवाड सर यांनीकेले तर आभार विद्या गोर्डे यांनी मानले.