पृथ्वी तलावर दोनच समर्थ! पहिले भगवंत आणि दुसरे संत!–ह भ प संजयजी महाराज जगताप (भऊरकर)
शिर्डी (प्रतिनिधी) या पृथ्वीतलावर दोनच समर्थ आहेत. पहिले भगवंत आणि दुसरे संत! जगाला नियंत्रित करणारी शक्ती म्हणजे ईश्वर व ईश्वराला प्राप्त करणारी शक्ती म्हणजे भक्ती, असे निरूपण प्रसिद्ध कीर्तनकार व संजयजी महाराज (भऊरकर) यांनी केले.वै. वेदशास्त्रसंपन्न श्री.ह भ प सुभाष गुरुजी महाराज (पाठक) यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणा निमित्ताने येवला तालुक्यातील अंदरसुल येथे सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहातील किर्तन महोत्सवात पहिले पुष्पगुंतांना ते बोलत होते.
तत्पूर्वी येथील पाठक परिवार व अंदरसुल ग्रामस्थ यांच्या वतीने ह भ प संजयजी महाराज जगताप यांना स्मृतीचिन्ह व संत निवृत्तीनाथ महाराज यांची गाथा भेट देण्यात आली व यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी ह भ प संजयजी महाराज जगताप यांनी –आवडे देवासी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार; रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा रुदय कळवळा वैष्णवांचा ;आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारित आण नाही; एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी; हा संत एकनाथ महाराजांचा अभंग यावेळी कीर्तन सेवेसाठी घेतला होता. यावेळी या सुश्राव्य अशा कीर्तनात अनेक दृष्टांत देत निरूपण करताना ह भ प संजयजी महाराज जगताप पुढे की,या पृथ्वीतलावर दोनच समर्थ आहेत .पहिला भगवंत आणि दुसरे संत ,भगवान परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली. या सृष्टीमध्ये वेगवेगळे प्रकारचे जीव निर्माण केले. प्रत्येक जीवप्राणी मात्राला ज्याच्या त्याच्या योग्यते प्रमाणे बुद्धी दिली. इतर पशुपक्षी जीवजंतू यांच्या पेक्षा भगवंताने मानवाला विशेष बुद्धी प्रदान केली. मानवाच्या ठिकाणी मानवाने त्याच्या कर्तव्याने जे कर्तव्य ,कर्म सिद्ध केले. त्यामध्ये तो या विश्वामध्ये आपापल्या कार्यपद्धतीने आपापल्या कलाकौशल्याने, आपआपल्या सदाचाराने जग मान्य होऊ शकतो. असा तोच मानव भगवंताला आवडतो .जो मानव भगवंताची सृष्टी आणि भगवंताची शक्ती याची नित्य जाणीव ठेवून जीवन जगत असतो आणि भगवंताच्या कार्याप्रती कृतज्ञ भाव, अखंड मनामध्ये बाळगून भगवंताच्या चिंतनाशी समरस होऊन जीवन जगतो. तो देवाला आवडतो. असे जीवन जगणारे संत, महापुरुष असतात. त्यामध्ये ऋषीमुनी ,सिद्ध महात्मे, अनेक धर्माचे, अनेक सांप्रदायाचे महापुरुष असतात . पण त्या सर्वांचा भाव एक असतो. परमात्मा शक्ती, ईश्वर शक्ती, जगाला नियंत्रित करते. त्या ईश्वरावरच जग चालते. मग अश्या ईश्वराला कोणी कोणतेही नाव देऊ शकतो. तसेच संत, महापुरुष म्हणजे ते अनेक धर्मातील जरी वेगवेगळे महापुरुष असले तरी पण त्या ईश्वरी शक्तीशी त्यांचे अतूट नाते झालेलेअसते. त्यांचा ईश्वराशी आनंदभाव एकरूप झालेला असतो. तो ईश्वरा प्रती श्रद्धा भावच असतो. व अशा एका समर्थ असणाऱ्या संत महात्मा कडूनच आपल्याला मार्ग दाखवला जातो. व या भक्तीमार्गावरच दुसऱ्या समर्थांकडे म्हणजे भगवंताकडे आपण पोहोचू शकतो. असे यावेळी संजयजी महाराज जगताप यांनी सांगितले. यावेळी कीर्तनाला मोठ्या संख्येने भजनी मंडळी, वारकरी, भाविक ,पुरुष, महिला, युवक, अंदरसुल व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.