शिर्डीच्या साई संस्थांनला महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची ट्रीवो इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा देणगी स्वरूपात भेट!
शिर्डी ( राजकुमार गडकरी)
शिर्डी येथीलश्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था करीता महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या वतीने महिंद्रा ट्रीवो इलेक्ट्रीक ऑटोरिक्षा देणगी स्वरुपात देणेत आलेली आहे. संस्थानच्या वतीने वाहनाची विधीवत पुजा करुन महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या वतीने रसयश जोशी (सीएफओ) यांनी श्री साईबाबा संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांचेकडे वाहनाची चावी सुपुर्द केली. त्यानंतर संस्थानचे वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी श्री जोशी यांचा श्री साईबाबांची मुर्ती व शाल देवून सत्कार केला. यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीप भोसले, विश्वनाथ बजाज व वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ आदी उपस्थित होते.
यापूर्वीही महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या वतीने नवीन वाहने साई संस्थांनला देणगी दाखल देण्यात आलेले आहेत.