श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्यासाठी विखेपाटील कुटुंबाकडुन सालाबादप्रमाणे मदत प्राप्त.
गोगलगांव (सत्तेचा महासंग्राम न्युज)
सुरेश ठोके.
आषाढी एकादशी निमीत्त श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांची पायी दिंडी दि.27 जून 2024 रोजी गोगलगाव,ता-राहाता येथे मुक्कामी होती.दिंडी प्रशासनाच्या वतीने दिलेल्या माहीतीनुसार दिंडीत अंदाजे 25 ते 30 हजार वारकरी असल्याचा अंदाज वर्तवला होता.तथापी सन्मा.पद्मभूषण कै.डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी दत्तक घेतलेल्या गावाला विखे कुटूंबीयाची मदत करण्याची परंपरा आहे.अशीच परंपरा पुढे चालवून गतवर्षी मुक्कामी दिंडीतील भावीकांची पावसाळयातील गैरसोय टाळण्यासाठी राज्याचे महसुल व दुग्धविकास मंत्री सन्मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील व सन्मा.मा.खा.डॉ.सुजयदादा विखे पाटील यांनी गोगलगांव दिंडी नियोजन कमीटीकडून आढावा घेऊन गावातील पालखी मार्गावर तसेच वारकऱ्यांच्या राहुटयांच्या ठिकाणी साफसफाई व मुरूमीकरण,हनुमान मंदीरासमोर पेव्हर ब्लॉक दुरूस्ती,पिण्याचे शुध्द पाण्याचे नियोजन,लायटींग व्यवस्था,दिंडी पालखी आगमनाच्या वेळी फटाक्यांची आतशबाजी सोबत इतर आवश्यक बाबीची प्रकर्षाने काळजी घेण्यासाठी यंत्रणा सक्रीय केली होती व त्यासाठी येणाऱ्या खर्चाची जबाबदारी घेतली होती.
त्या अनुषंगांने सन्मा.मा.खा.डॉ.सुजयदादा विखे पाटील यांनी जनसेवा कार्यालयाकडून दि.25 सप्टें,2024 रोजी रोख रक्कम रू.73,000/- गोगलगांव ग्रामस्थांकडे सुपूर्द केली.
यावेळी गावकऱ्यांनी राज्याचे महसुल व दुग्धविकास मंत्री सन्मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील,सन्मा.मा.ना.सौ.शालीनीताई विखे पाटील,सन्मा.मा.खा.डॉ.सुजयदादा विखे पाटील,सौ.धनश्रीताई विखे पाटील यांचे आभार मानले.याप्रसंगी दिंडी नियोजन कमिटीचे सरंपच भाऊसाहेब खाडे,उपसरपंच प्रदीप दुशिंग,पोलीस पाटील देवराम मगर,कानिफनाथ मगर,मारूती ठोके,नामदेव पांढरकर,राधाकृष्ण गायकर,गोरक्ष गायकर,सारंगधर खाडे,यशवंत पगारे,मुरलीधर दुशिंग,बाळासाहेब ठोके,शंकर पडवळ,संतोष गुजर आदी गावकरी उपस्थीत होते.