दर्जेदार द्राक्ष उत्पादक कमी खर्चात कसे घ्यावे यासाठी राजुरी येथे शेतकऱ्यांसाठी परिसंवादाचे आयोजन.
विजय बोडखे
राजुरी ( सत्तेचा महासंग्राम न्युज)
द्राक्ष फळपिकाचे कमीतकमी खर्चात दर्जेदार द्राक्ष उत्पादन कसे घ्यावे या विषयावर शेतकरी परिसंवादाचे आयोजन राहाता तालुक्यातील राजुरी येथे करण्यात आले होते
राहाता तालुक्यातील राजुरी येथे शेतकऱ्यांसाठी परिसंवादाचे आयोजन केले होते या परिसंवादास तालुक्यासह इतर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक मोठया संख्येने उपस्थित होते.कमीत कमी खर्चात दर्जेदार द्राक्ष उत्पादन या विशयावर यक्ष द्राक्ष नगरीचे प्रमुख संचालक विजय कुंभार तसेच श्री ऍग्रो सर्विस सेंटर बाभळेश्वर .दादासाहेब गायकवाड, सेवा निवृत्त तालुका कृषी अधिकारी यांचे प्रयत्नातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर परिसंवादामध्ये माजी कृषी अधिकारी दादासाहेब गायकवाड यांनी उपस्थित द्राक्ष उत्पादक यांना येणारे समस्या अडचणी, उत्पादन खर्चात झालेली वाढ इत्यादी समस्याचे प्रस्ताविकामध्ये मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांनी कोणतेही फळपिकाचे लागवड करण्यापूर्वी अभ्यास करून प्रषिक्षण घेउन, षिकून शेती करावी याबाबत सविस्तर मार्गदर्षन केले.यक्ष द्राक्ष नगरी तासगाव जि.सांगलीचे संचालक विजय कुंभार यांनी द्राक्ष बागेची खरड छाटणीचे तंत्रज्ञान व ऑक्टोबर मध्ये छाटणी करावयाची कामे, द्राक्षावर येणारी रोग, किड उपाययोजना इत्यादी वर होणारा भरमसाठ खर्च कमी कसा करावा व दर्जेदार द्राक्ष उत्पादन घेणेबाबत शेतक-यांना सविस्तर मार्गदर्षन केले . छाटणीमध्ये करावयाची कामे, द्राक्षावर येणारी रोग, किड उपाययोजना इत्यादी वर होणारा भरमसाठ खर्च कमी कसा करावा व दर्जेदार द्राक्ष उत्पादन घेणे बाबत शेतक-यांना सविस्तर मार्गदर्षन केले व द्राक्ष उत्पादक यांनी तणावमुक्त जीवन जगावे असा सल्ला दिला. उपस्थित द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी यांनी विचारलेल्या प्रश्नाचे निरसन केले. शेवटी यक्ष द्राक्ष नगरीचे सोमनाथ गवळी यांनी उपस्थित सर्व उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानले. सदर परिसंवादास राहाता तालुक्यासह राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादक मोठया या कार्यक्रमास उपस्थित होते .