चिमुकल्याण सोबत वाढदिवस साजरा केल्याने मनस्वी आनंद… माजी आमदार भानुदास मुरकुटे
टाकळीभान प्रतिनिधी — कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा भानुदास मुरकुटे साहेब यांचे खंदे समर्थक मयुर पटारे यांच्यावतीने लोकनेते माजी आमदार श्री. भानुदास मुरकुटे साहेब यांच्या ८३व्या वाढदिवसानिमित्त टाकळीभान येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे गुणवंत आणि गरजुवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बोलताना माजी आमदार मुरकुटे साहेब म्हणाले की माणूस आपल्याला आयुष्यात कितीही मोठा झाला तरी आपल्या प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या शाळेला विसरू शकत नाही. त्यामुळे प्राथमिक शिक्षण हाच आपल्या आयुष्याचा खरा पाया आहे असल्याचे ते म्हणाले. आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत चीमुकल्यांसोबत वाढदिवस साजरा करायला मिळाल्याने मनस्वी आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना बाजार समितीचे संचालक मयुर पटारे म्हणाले की दुसऱ्यांच्या आनंदात आपला आनंद शोधणे ही आम्हाला साहेबांची शिकवण आहे. त्याच भावनेतून प्राथमिक शाळेतील गुणवंत आणि गरजूवंत विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करून त्यांना आनंद देण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही केला असल्याचे सांगत त्यांनी आदरणीय साहेबांच्या दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, कारेगाव भागचे संचालक शिवाजी शिंदे, एकनाथ लेलकर, संत सावताचे संचालक विलास दाभाडे, लोकसेवाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाघुले संजय रणनवरे, सोमनाथ पाबळे, बाबासाहेब लोखंडे, मेजर, विनोद रणनवरे, भास्कर कोकणे, शिवाजी पटारे, जालिंदर बोडखे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश कोकणे, तुकाराम बोडखे, शिवाजी पवार, दत्तात्रय पटारे, भाऊसाहेब पटारे, संजय पटारे, संभाजीराव धुमाळ, शामराव खरात, किशोर बनकर, योगेश बिरदवडे, मोहन रणनवरे, सागर पटारे, दादासाहेब पटारे, पंकज परदेशी, रिपाईचे युवा तालुकाध्यक्ष जॉन रणनवरे, अजय दुधाळे, हर्षद दाभाडे, वैभव रणनवरे, , जिल्हा परिषदशाळेचे मुख्याध्यापक आनिल कडू, शिक्षक कुमार कानडे, पठारे सर व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.