सावळीविहीर बुद्रुक येथे ग्रामसभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न! विविध ठराव पास!
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
राजकुमार गडकरी
शिर्डी (सत्तेचा महासंग्राम वृत्तसेवा)
राहाता तालुक्यातील सावळविहीर बुद्रुक येथे नुकतीच ग्रामसभा मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्षपदी जिजाबा आगलावे व उपाध्यक्षपदी संदीप विघे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .व विविध ठराव घेण्यात आले.
या ग्रामसभेच्या अध्यक्षपदी सरपंच ओमेश जपे हे होते. यावेळी उपसरपंच विकास जपे, राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक शांताराम जपे,सोसायटीचे चेअरमन दिलीपराव जपे, माजी सरपंच अशोकराव आगलावे, जिजाबा आगलावे, ग्रामसेवक कारले, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या ग्रामसभेमध्ये उपस्थित नागरिकांनी कार्यकर्त्यांनी विविध सूचना मांडल्या. या संपूर्ण सूचना वर ग्रामसभेत चर्चा होऊन विविध ठराव करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष सरपंच ओमेश जपे यांनी झालेल्या चर्चा संदर्भात व विविध मागण्या संदर्भात बोलताना सांगितले की, सावळीविहीर येथे पूर्वी बस स्टॅन्ड होते. मात्र ते आता नसल्यामुळे बसेस थांबत नाहीत. पण येथे बसेस थांबाव्यात. त्यासाठी सध्या रुई फाटा लगत नगर मनमाड रस्त्याच्या दोन्ही बाजूने विद्यार्थ्यांसाठी, प्रवाशांसाठी बसेस थांबवाव्यात म्हणून तात्पुरते फलक लावून बस थांबा करण्यात येईल. तसेच गावामध्ये विविध रस्ते ड्रेनेज स्ट्रीट लाईट आदी कामे ही तातडीने हाती घेण्यात येतील. अनेक ठिकाणी कामे सुरू असून तीही लवकरात लवकर पूर्ण कशी होईल यासाठी प्रयत्न ग्रामपंचायत करेल. गावात लवकरच औषध फवारणी करण्यात येणार आहे. असे सांगत एकल पालक महिला सर्वे सादर होणार असून विविध योजना गावात आणण्यासाठी प्रयत्न होत आहे. सध्या साई संस्थांनने इतर ठिकाणी मंदिरे बांधण्याचा जो निर्णय घेतला. त्याचा ग्रामसभेत निषेध करण्यात आला असून साई मंदिर भक्तांनी बांधावे मात्र संस्थानने त्यासाठी खर्च करू नये असेही या ग्राम सभेत ठरवण्यात आले. गावातील जाणाऱ्या चराच्या कडेला दोन्ही बाजूने आंबा नारळ जांभूळ आदी झाडे लावण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अवैध धंदे व शांतता गावांमध्ये नादांवी यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे कारवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर झाडे लावू नये, दगडे टाकू नये व अस्वच्छता करू नये असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच गावातील श्री परशुराम महाराज यात्रा व हरिनाम सप्ताह आणि साई चरित्र पारायण च्या वेळेस यात्रा कमिटी वर्गणी करते. त्या व्यतिरिक्त कोणतीही वर्गणी सक्तीने करू नये असे यावेळी ठरवण्यात आले. रेशन दुकान हे वेळेवर सुरू राहावे अन्यथा ते सोसायटी किंवा महिला बचत गटाला देण्यात येईल. असे यावेळी त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. या ग्रामसभेमध्ये माजी सरपंच अशोकराव आगलावे, सोपानराव पवार, विलासराव आगलावे, विक्रम आगलावे, दिलीपराव कापसे, गणेश कापसे, गणेश आगलावे, गणेश बनसोडे, प्रदीप नितनवरे, राजू जपे आदींनी व उपस्थित काही ग्रामस्थांनी गावातील समस्या, प्रश्न यावेळी मांडले. ग्रामसभेमध्ये गणेश आगलावे यांनी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉक्टर सुजय विखे पा. यांनी गावातील महिलांना पंढरपूर तुळजापूर दर्शन घडवले. त्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला व तो सर्वांनुमते मंजूर करण्यात आला. त्याचप्रमाणे पाणी साठवण बंधाऱ्यातील प्लास्टिक कागद काढावा, बाजार तळ व शाळा परिसर कायम स्वच्छ ठेवण्यात यावा, सावळविहीरवाडीवर विविध योजना राबविण्यात याव्यात. अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.
या ग्रामसभेत , काही दिवसापूर्वी गावात झालेल्या हत्याकांड व नुकतेच निधन झालेल्या व्यक्तींना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच ग्रामसभेच्या शेवटी सर्वांनी अवयव दान करण्यासाठी सामूहिक शपथ घेतली.
या ग्रामसभेला सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला अंगणवाडी सेविका मदतनीस, युवक विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध खात्याचे कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.