प्रवरा मेडीकल ट्रस्टची आत्याधुनिक कॅथलॅब ही हदयरुग्णांसाठी नवसंजीवनी ठरेल – कुलपती डॉ राजेंद्र विखे
राजुरी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
मेडीकल ट्रस्टची आत्याधुनिक कॅथलॅब ही हदयरुग्णांसाठी नवसंजीवनी ठरेल असे मनोगत प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी आज व्यक्त केले. प्रवरा मेडीकल ट्रस्टने सुमारे २० कोटी रुपये खर्च करुन ह्दय रुग्णांवर आत्याधुनिक तंत्रज्ञानाने उपचार व्हावेत यासाठी साई सिंधु कार्डीअक केअर सेंटरची स्थापना केली. या सेंटरचे लोकार्पण आज डॉ राजेंद्र विखे पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी डॉ राजेंद्र विखे पाटील बोलत होते. यावेळी अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ व्ही.एन.मगरे , कुलसचिव अरुणकुमार व्यास , डॉ रविंद्र मनेरिकर, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त सुवर्णाताई विखे पाटील , धृव विखे पाटील, डॉ सतिश महाजन प्रसिद्ध हदयरोग तज्ञ डॉ सुनील दिघे आदी मान्यवर उपस्थितीत होते.
पुढे बोलतांना डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी कोविड नंतर काळात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यात ह्दयरोगाचे प्रमाण खुप वाढले आहे. जिल्हातील रुग्णांवर कमी खर्चात अधिक चांगले उपचार झाले पाहीजे यासाठी प्रवरा मेडीकल ट्रस्ट ने ही कॅथलॅब उभारली आहे. आणि काही दिवसातच बायपास शस्त्रक्रिया सुरु करण्यात येतील समाज्यातील शेवटच्या माणसांला केंद्रबिंदु समोर ठेऊन हे कार्य सुरु असुन पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या पदचिन्हावर ही संस्था चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अल्प खर्च आणि चांगले उपचार यासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयाचा ह्दयरोग विभाग ओळखला जाईल अशी अपेक्षा या विभागाचे प्रमुख डॉ सुनिल दिघे यांच्या कडुन डॉ विखे पाटील यांनी बोलतांना व्यक्त केली.यावेळी बोलतांना कुलगुरु डॉ व्ही.एन. मगरे यांनी हे सेंटर प्रवरेच्या नावलौकीकात अधिकची भर घालेलअसा विश्वास व्यक्त केला.