चंद्रापुर येथे शुक्रवारी मोफत आरोग्य शिबिर ..
लोणी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
पायरेन्स इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन( आय बी एम ए) लोणी,राष्ट्रीय सेवा योजना, सिनर्जी क्लब आणि डॉ.विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटर चंद्रपूर लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रापूर (लोणी) येथे मोफत आयुर्वेद रोग निदान व चिकित्सा शिबिराचे आयोजन शुक्रवार दिनांक १५ मार्च २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय चंद्रापूर येथे केले आहे. अशी माहिती पायरेन्सचे संचालक सचिव डॉ. निलेश बनकर यांनी दिली आहे.
शिबिरामध्ये महिलांची मोफत आरोग्य रक्त तपासणी व उपचार केले जातील महिलांमध्ये विशेष करून आढळणाऱ्या मासिक पाळीच्या सर्व तक्रारी ,अत्याधिक रक्तस्राव, गर्भाशयाचे आजार ,व्यंधत्व ,अनियमित मासिक पाळी ,मधुमेह, ब्लड प्रेशर, आम्लपित्त ,संधिवात सौंदर्य विषयक तक्रारी ,मानदखी ,गुडघ्या संबंधित आजार अशा महिलांमध्ये आढळणाऱ्या आरोग्य विषयक आजाराचे आयुर्वेदाद्वारे मोफत रक्त तपासणी व उपचार स्त्री रोगतज्ञांमार्फत करण्यात येईल आजाराचे निदान व मोफत औषधी उपचार मिळेल परिसरातील सर्व माता भगिनींनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन पायरेन्स आय बी एम ए च्या संचालिका डॉ.अनिता खटके यांनी केले आहे .