गांधी विचार संस्कार परिक्षेत खुळपे व तुपे जिल्ह्यात प्रथम.
लोहगाव ( सत्तेचा महासंग्राम न्युज)
महात्मा गांधी जैन फाउंडेशन जळगाव आणि रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय गांधी विचार संस्कार परीक्षेत कृष्णा खुळपे व दिपाली तुपे यांनी अहमदनगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
महात्मा गांधी जैन फाउंडेशन जळगाव यांच्या वतीने या शैक्षणिक वर्षात घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय गांधी विचार संस्कार परीक्षेत महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील १०९३ विद्यार्थी प्रविष्ट झाली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेतील इयत्ता दहावीतील विद्यार्थी कृष्णा दादा खुळपे व अकरावीतील विद्यार्थिनी दिपाली भागिनाथ तुपे यांनी अहमदनगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर सिकंदर शक्रीम पठाण यांनी द्वितीय व अर्शद इशाक शहा यांने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच विद्यालयास मानाचे पदक प्राप्त झाले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल रावसाहेब म्हस्के, अरुण कडू पाटील, एकनाथ घोगरे, प्राचार्य अंगद काकडे, मुख्याध्यापिका सिंधू क्षेत्रे, उपप्राचार्या अलका आहेर, प्रभारी पर्यवेक्षक संजय ठाकरे, गांधी विचार संस्कार परीक्षेचे राज्य समिती सदस्य व जिल्हा समन्वयक डॉ. शरद दुधाट, समन्वयक अनिल गोलवड, कालिंदी कासार यांच्यासह पालक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.