क्रिडा व मनोरंजन
शाहिर नंदकुमार खरात यांना जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
0
9
1
3
8
3
राहाता (सत्तेचा महासंग्राम न्युज)
शाहीर नंदकुमार खरात यांना महाकवी वामनदादा कर्डक जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कला, साहित्यीक, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल शाहीर नंदकुमार खरात यांना ज्येष्ठ कलावंत रघुवीर खेडकर, नंदा पुणेकर, बाळासाहेब आव्हाड, नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष सिमाताई कोकाटे, माजी आमदार कांबळे, पोलीस अधिकारी सातव, डॉ. एम. वाय. देशमुख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाहीर खरात यांचे आर. पी. आय. चे जिल्हा युवा अध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे, रुईचे सरपंच संदीप वाबळे, सम्राट ग्रुपचे रमेश कोळगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष भाऊराव पाटील शिरसाठ, शिर्डीचे प्रसिद्ध सर्जन डॉ. एम वाय देशमुख अभिजीत देशमुख यांनी अभिनंदन केले आहे
0
9
1
3
8
3