टाकळीभान येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत चषक ओन्ली साई क्रीडा मंडळाने पटकावला…
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्यूज नेटवर्क डिजिटल मिडिया
टाकळीभान ,(सत्तेचा महासंग्राम न्युज )
– टाकळीभानचा कबड्डी चषक ओन्ली साई क्रीडा मंडळाने पटकावला.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून आझाद क्रीडा मंडळ व पत्रकार सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने टाकळीभान येथे भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. १३ व १४ जानेवारी सलग दोन दिवस या स्पर्धा सुरू होत्या. सेमी फायनल व फायनल सह सर्वच सामने ही अत्यंत चुरशीचे झाल्याने उपस्थित प्रेक्षकांचे डोळ्याचे पारणे फिटले.
आपापल्या संघांच्या विजयासाठी शेवटच्या सेकंदापर्यंत आपण विजयी होऊ या आशेने खेळाडू बाजी लावून लढत होते. त्यामुळे अटीतटीचे व रंगतदार सामने प्रेक्षकांना पाहायला मिळाले. येथील अंतिम सामन्यांमध्ये ओन्ली साई क्रीडा मंडळ टाकळीभान या संघाने ११ गुणांनी बाजी मारली व चषक व २१ हजार रुपये रोख पारितोषिक या संघाने पटकन तो स्पर्धेचा मानकरी ठरला. तर द्वितीय पारितोषिक १५ हजार व चषक मिळवून जय हिंद क्रीडा मंडळ संघ उपविजेता ठरला.
तृतीय क्रमांकाचे बक्षीस ११ हजार आझाद क्रीडा मंडळ टाकळीभान यांने मिळवली असून चतुर्थ बक्षीस ७ हजार व चषक त्रिमूर्ती संघ नेवासा यांने मिळवले.या स्पर्धेमध्ये सर्वच सामान्यांमध्ये विजयासाठी संघा मध्ये चुरस पाहायला मिळाली. त्यामध्ये सेमी फायनल व फायनल स्पर्धे मध्ये शेवटच्या सेकंदापर्यंत खेळाडूंनी आपल्या संघाच्या विजयासाठी प्रयत्न केले. सामन्यांमध्ये रंगत वाढली व प्रेक्षकांचेही चांगले मनोरंजन झाले. अंतिम फायनल सामन्यांमध्ये ओन्ली साई क्रीडा मंडळाचे 33 गुण तर जय हिंद क्रीडा मंडळ श्रीरामपूर यांनी २१ गुण मिळवले. ११ गुणांनी ओन्ली साई क्रीडा मंडळ संघ टाकळीभान कबड्डी स्पर्धा चषकाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.
विजयानंतर विजेते खेळाडू , संघाचे मार्गदर्शक, क्रीडा प्रेमींनी जल्लोष केला. स्पर्धे प्रसंगी शासकीय पंचांनी अचूक निर्णय घेत आलेल्या सर्व खेळाडूंना न्याय दिला. या बक्षीस वितरण प्रसंगी दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे संपादक करण नवले, ज्येष्ठ कबड्डी खेळाडू किरण धुमाळ, भैया पठाण,अनिल पटारे सर, शशिकांत गाढे,गोरक्षनाथ कोकणे,शिवाजी पटारे, बंडोपंत बोडखे,सुरेश पवार, मेजर सचिन माघाडे, मेजर मुन्ना इनामदार ,अनिता तडके व आझाद क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य, क्रीडाप्रेमी ग्रामस्थ आदींच्या हस्ते रोख बक्षीस व चषकाचे वितरण झाले. क्रीडा प्रेमींनी दोन दिवस या कबड्डी खेळाचा मनमुराद आनंद लुटला.स्पर्धे प्रसंगी पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या दोन दिवसीय स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाल्या. या स्पर्धा यशस्वीतेसाठी, आजाद क्रीडा मंडळ, ताई प्रतिष्ठान पत्रकार संघ व गावातील सर्व क्रीडा मंडळांनी सहकार्य केले. आयोजकांच्या वतीने आझाद क्रीडा मंडळाचे रवींद्र गाढे यांनी सर्वांचे आभार मानले.