असलाम इनामदार यांचा भव्य नागरी सत्कार
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम वृत्तसेवा)
– टाकळीभान चे भूषण व भूमिपुत्र भारतीय कबड्डी संघातील खेळाडू व एशियन गेम्स 2023 चा सुवर्णपदक विजेता असलमभाई इनामदार यांचा टाकळीभान च्या वतीने भव्य नागरिक सत्कार महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधा विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थित साजरा केला जाणार आहे अशी माहिती उपसरपंच कान्हा खंडागळे व सरपंच रणनवरे यांनी दिली आहे
हा सत्कार समारंभ ताई प्रतिष्ठान, ओन्ली साई कबड्डी क्लब, पत्रकार सेवा संस्था, व ग्रामस्थ यांच्या वतीने गुरुवार दिनांक 12 ऑक्टोंबर 2023 रोजी सायंकाळी ठीक 6 वा. टाकळीभान ग्रामपंचायत समोर संपन्न होणार आहे
याप्रसंगी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश बोला, उप महा कबड्डी असोशियन श्रीकांत गाडे, बाबुराव चांदरे, आंतरराष्ट्रीय खेळाडू अशोक शिंदे, भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, नितीन नितीन दिनकर, ज्ञानेश्वर खुरंगे, किरण वाघ, माजी सभापती नानासाहेब पवार, माजी सभापती दीपक अण्णा पटारे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रवीण सिनारे, माजी सरपंच मंजाबापू थोरात, मौलाना अहमद शेख, असलम भाई मातोश्री जाकेरा इनामदार आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे तरी क्रीडा प्रेमी ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान उपसरपंच कान्हा खंडागळे व सरपंच अर्चना रणनवरे यांनी केले आहे.