फरार आरोपी सोनू उर्फ इक्बाल शेख यास श्रीरामपूर तालुका पोलिस पथकाने पकडले.
श्रीरामपूर प्रतिनिधी:- फरार आरोपी सोनू उर्फ इकबाल शेख, यास श्रीरामपूर तालुका पोलिसांनी पथकाने पकडले ,
सोनू उर्फ इक्बाल सिकंदर शेख राहणार टाकळीभान यास मागील गुन्ह्यात फरारी असलेला, आरोपी आज श्रीरामपूर कोर्टात बाहेर अटकपूर्व जामीन घेण्यासाठी आला असता, त्यास पी आय दशरथ चौधरी यांच्या पथकाने पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू त्रिभुवन व पोलीस कॉन्स्टेबल कारळे संतोष यांनी सापळा लावून पकडून तालूका पोलीस स्टेशन येथे नेले , त्याच्यावर या अगोदर भोकर येथील 302 चा व भोकर येथील कापूस व्यवसायाला तीन लाखाचा लुटल्याचा गुन्हा दाखल आहे तसेच संदीप बोडके यास धाक दाखवून रॉबरी लुटल्याचा गुन्हा सुद्धा दाखल आहे तसेच तीन दिवसापूर्वी संदीप बोडके यांचे किराणा दुकान जाण्याचा गुन्हा दाखल आहे,
सदर आरोपीस आज कोर्टाच्या आवाराबाहेर पकडण्यात पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू त्रिभुवन व पोलीस कॉन्स्टेबल संतोष कराळे यांनी त्यास पकडले आहे, व पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे,