Breaking
गुन्हेगारी

डॉ. विटनोर यांच्यावरील खोटा ॲट्रॉसिटी गुन्हा रद्द करावा –  विजय तमनर यांची मागणी

0 9 1 3 8 5

सत्तेचा महासंग्राम ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया

राहुरी (डिजिटल मिडिया वृत्तसेवा)

राहुरी : डॉ. अनिल विटनोर व प्राची विटनोर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान, राहुरी.तालुका व यशवंत सेना, अहिल्यानगर यांच्या वतीने तहसील कार्यालयावर धनगर समाजाचा मोर्चा काढण्यात आला होता .
यावेळी ज्ञानेश्वर बाचकर, रामदास बाचकर, पिंटूनाना साळवे, बाळासाहेब जाधव, रवीभाऊ मोरे, सुरेश अप्पा निमसे, अण्णासाहेब पाटील बाचकर, डॉ. प्राची विटनोर, डॉक्टर घावटे, नानासाहेब पाटील जुंधारे आदी मान्यवरांनी तीव्र शब्दात या घटनेचा जाहीर निषेध नोंदविला.
यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजय तमनर यांनी यावेळी म्हणाले दि- १ सप्टेंबर २०२३ ला रात्री ११-३० वाजता डॉ. विटनोर यांचा फोन आला की माझ्यावर खोटी ॲट्रॉसिटी ची केस दाखल करण्यात आली आहे. तुम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला या मी स्वतः पोलीस स्टेशनला पोहोचून पोलिस निरिक्षक धनंजय जाधव यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.एक महिला डॉक्टर सांगत होती की माझ्या हॉस्पिटल वर हल्ला करण्यात आला तोडफोड झाली आहे मला फिर्याद द्यायची आहे परंतु प्रकरण गंभीरतेने न घेता रात्री उशिरा पोलीस प्रशासनाने फिर्याद दाखल करून घेतली.
महिला डॉक्टर असून कुठलीही काळजी पोलीस प्रशासनाने घेतली नाही उलट मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला.धनगर समाजातील मेंढपाळ कुटुंबातून आई-वडिलांनी कष्ट करून मुलांना डॉक्टर केले परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे डॉक्टर विटनोर  यांना गंभीर गुन्ह्यामध्ये गुंतविण्यात पोलीस निरीक्षक धनंजय जाधव कारणीभूत आहेत असा आरोप विजय तमनर यांनी केला.
या सर्व घटनेची तक्रार मुख्यमंत्री,गृहमंत्री,पोलीस अधीक्षक,यांच्याकडे करण्यात येईल सदर घटनेमध्ये चार दिवसात ॲट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करावा व गुन्हा खोटा अढळल्यास सदरील वेक्तीला कठोर शिक्षा व्हावी अन्यथा डॉक्टर विटनोर यांच्या कुटुंबासह संपूर्ण धनगर समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची प्रशासनाने नोंद घ्यावी.
यावेळी मागणीचे निवेदन राहुरीचे तहसीलदार रजपूत यांना देण्यात आले तर या मोर्चात सर्वजण उपस्थित राहून पाठिंबा दिल्याबद्दल डॉ. प्राची विटनोर यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी गंगाधर पाटील तमनर, ज्ञानेश्वर बाचकर, अण्णासाहेब बाचकर,रामदास बाचकर, अण्णासाहेब बलमे, विठ्ठल बाचकर, अनिल डोलनर, विजय बलमे, डॉ. एकनाथ बाचकर ,विलास विटनोर, डॉ. घावटे,भाऊसाहेब जगन्नाथ विटनोर, संदेश जुंधारे, रभाजी गावडे, मच्छिंद्र बाचकर, तुषार बाबासाहेब विटनोर, आप्पासाहेब लक्ष्मण विटनोर, किशोर सूर्यभान तमनर, सर्जेराव जगन्नाथ लाटे, डॉ. सुनील विटनोर, विजय विटनोर, रवी भाऊ मोरे, वर्षाताई बाचकर, रेखाताई नरवडे, नानासाहेब जुंधारे,अर्जुन पाटील बाचकर, संदीपराव विटनोर, संदीप तमनर, वसंत पाटोळे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे