गोगलगावत भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले..
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
गोगलगाव (सत्तेचा महासंग्राम न्युज)
-सुरेश ठोके
गोगलगाव तालुका राहाता येथे गेल्या महिन्याभरात भर दिवसा घरफोडीच्या तीन घटना घडल्याच्या समोर आलेल्या आहेत.
महिनाभरापूर्वी पांडुरंग जयवंता चौधरी हे दवाखान्यात गेल्याचे पाहून पाळत ठेवून घरातील मौल्यवान वस्तू व पैसे असे 70 हजार रुपये ऐवज चोरांनी भर दिवसा चोरून नेला. सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी रवींद्र सुखदेव दुशिंग यांचे घराचे कुलूप तोडून चीज वस्तू चोरीला गेल्या होत्या.4 दिवसात म्हणजे आज दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी सोपान रामभाऊ पांढरकर यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून चोरांनी घरातील टीव्ही व मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याचे बोलले जाते.
यापूर्वी गावातील अनेक वस्त्यावरून शेतातील विजपंप, केबल, स्टार्टर तसेच ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या चोरीला जाण्याचे प्रकार झालेले आहेत. अशा प्रकारे भर दिवसा मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले असून गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भुरट्या चोरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस स्टेशनच्या संपर्कात संशितांची माहिती देण्याचे आवाहन पोलीस खात्याकडून करण्यात येत आहे.तसेच ग्रामपंचायतकडून गावामध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा तात्काळ सक्रिय करण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहेत.