स्कोडा कार मालकाच्या बंगल्यात लावत असताना अचानक तेथे इतर दोघांनी येत रस्त्यावरच जातीवाचक शिवीगाळ करत कारचालकाला केली जबर मारहाण! लोणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
शिर्डी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे आपल्या मालकाच्या बंगल्याच्या आत त्यांची स्कोडा कार लावत असताना समोरील सार्वजनिक रस्त्यावर या स्कोडा कार चालकास
दोन जणांनी गाडी समोर येऊन जातीवाचक शिवीगाळ करत जबर मारहाण करत जखमी केल्याची फिर्याद लोणी पोलीस स्टेशनला अरुण प्रभाकर सौदागर लोणी खुर्द तालुका राहता यांनी दाखल केली आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील अमोल बलभीम आहेर यांच्या स्कोडा कार क्रमांक एम एच 17 ए झेड 47 28 या कारवर चालक असणारा अरुण प्रभाकर सौदागर राहणार लोणी खुर्द यांनी लोणी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे की, आपण लोणी खुर्द येथील अमोल बलभीम आहेर यांच्या स्कोडा कारवर चालक म्हणून काम करत असून माझे कुटुंब लोणी खुर्द येथे राहते. दिनांक 26 /6/ 2024 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मी चालवीत असलेली अमोल आहेर यांची स्कोडा कार ही अमोल बलभीम आहेर यांच्या लोणी खुर्द येथील बंगल्याच्या आत गेट उघडून लावत असताना समोरील सार्वजनिक रस्त्यावर तेथे अचानक मोटरसायकलवर तीन जण आले . त्यापैकी पाठीमागे बसलेला व निळा शर्ट घातलेला महेश जालिंदर आहेर हा आपल्याकडे आला व आपल्या कारसमोर येऊन उभा राहून मला जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मी आपली काही चूक नसताना तू शिवीगाळ करू नको असे म्हटले. मात्र त्याने शिवीगाळ करतच आणखी त्याचा भाऊ विशाल जालिंदर आहेर याला बोलावून घेत या दोघांनी मिळून मला मारहाण केली. त्याचप्रमाणे तिथे माझी पत्नी स्वाती ही तिला कळाल्यामुळे मला सोडवण्यासाठी तेथे आली. तिलाही तू मध्ये येऊ नको तुझे तुकडे करू ! तुझ्या नवऱ्याला सोडणार नाही, असे म्हणत मारहाण केली. माझ्या पत्नीच्या कानाखाली मारली. त्याचप्रमाणे माझ्या उजव्या कानावर बुटाचा मार लागल्याने मी जखमी झालो असून मला व माझ्या कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ करत जबर मारहाण महेश जालिंदर आहेर व विशाल जालिंदर आहेर यांनी केली .अशा आशयाची फिर्याद त्यांनी लोणी पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरून लोणी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 367/ 2024अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 3(1)r, 3(1)s, 3(2)va, भादवि कलम 324/ 323 /504/ 506/ 34 याप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस करत आहेत.
चौकट
दरम्यान या घटनेचा समस्त मातंग समाजाच्या वतीने सर्वत्र निषेध करण्यात येत असून लोणी पोलीस स्टेशनला ही मातंग समाजाच्या वतीने निवेदन देऊन या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा संपूर्ण मातंग समाज या विरोधात तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराही मातंग समाजाच्या वतीने देण्यांत आलाआहे.