Breaking
गुन्हेगारी

घोगरगाव येथे रस्ता अडुन मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ नऊ जणांवर गुन्हा दाखल.

0 9 1 3 9 8

 

सत्तेचा महासंग्राम

ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया

 

दिलीप लोखंडे

टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम वृत्तसेवा)

 

शेजारील भावकीतील इसमांना सोबत घेऊन जाण्यांचा रस्ता अडून मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केल्याची घटना नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथे घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरून 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत किरण अण्णासाहेब कणगारे वय (37 )धंदा मजुरी राहणार घोगरगाव तालुका नेवासा यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले की माझी घोगरगाव येथे कणगरे वस्ती येथे गट नंबर 225 मध्ये राहते घर असून सदर ठिकाणी जाण्यासाठी तहसीलदार यांच्या आदेशाने रस्ता देण्यात आला होता व सदर शिवरस्ता कणगरे वस्ती या रस्त्याचे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत ठराव मंजूर होऊन सदर रस्त्याचे काही प्रमाणात काम झाले होते परंतु सदर रस्त्याने जाणे-येण्यापासून आमचे शेजारी संजय साहेबराव बहिरट अनिल साहेबराव बहिरट यांनी मागील 3 ते 4 वर्ष महिन्यापूर्वी मला जातीवाचक शिवीगाळ केली व तुम्हाला येथून तुमची शेती सोडून पळून जायला लावू अशी धमकी दिली अनेक वेळा आमचा जाणण्याचा रस्ता अडवला गावातील सरपंच पती सदाशिव पांडुरंग बहिरट यांनी मला ग्रामपंचायत मध्ये यायचे नाही,दलित वस्ती रस्त्याचे कोणतेही कागदपत्रे मागायचे नाही असे म्हणून शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच मागील एक महिन्यापूर्वी सदाशिव बहिरट व ग्रामसेवक यांनी कोणत्याही प्रकारची पूर्व माहिती न देता दलित वस्ती सुधार योजनेतील कणगऱे वस्ती ते शिवरस्ता हा रस्ता ठराव बदलून मंजूर करून माझी फसवणूक करून मला विष पिऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे तसेच माझे शेजारील अविनाश नाना कणगरे, विजय अविनाश कनगरे, प्रमोद अविनाश कणगरे वसंत नाना कणगरे,राजेंद्र वसंत कनगरे, संतोष अविनाश कनगऱे सर्व राहणार घोगरगाव यांनी सर्वांनी सदाशिव बहिरटच्या सांगण्या वरून मला व माझे कुटुंबियांना अनेक वेळा मारहाण करून माझी शेती मशागतीची तसेच माझ्या मुलाच्या शाळेचा रस्ता अडवून नुकसान केले

मी दलित वस्ती रस्ता घोटाळा उघड केल्याने सदाशिव बहिरट याने तो प्रकार उघड होऊ नये म्हणून वरील शेजारी भावकीतील इसम यांना सोबत घेऊन मला व माझे कुटुंबाला वेळोवेळी रस्ता अडवून जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे सदर फिर्यादी संत लुक हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे
या फिर्यादीवरून संजय साहेबराव कणगरे,अनिल साहेबराव बहिरट,सदाशिव पांडुरंग बहिरट अविनाश नाना कणगरे, विजय अविनाश कणगरे,संतोष अविनाश कणगरे, प्रमोद अविनाश कणगरे, वसंत नाना कणगरे व राजेंद्र वसंत कनगरे या 9 जणांवर भारतीय दंड विधान कलम 341,143,147,223,504,506 व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम 3(1), ( आर ), व(एस ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे याचा पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 9 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे