सासर्याच्या अश्लील हालचालीने रेनवडीची विवाहिता बेघर.
पारनेर (प्रतिनिधी)
पारनेर आणि जुन्नर सिमेवर असणारे तालुक्यातील रेनवडी या गावाकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने या गावात अनेक अपप्रवृत्ती बळावताना दिसतात त्यातुनच नैतिकतेचा बोजवारा उडताना दिसतो.येथील एका परिवारातील विवाहिता आपल्या सासऱ्याच्या अश्लील हालचालीने त्रस्त झालीं असुन तिच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे तिने एक वर्षापासून तालुक्यातील कन्हेर पोखरी येथील आपले माहेर गाठले असुन पती सासरे विरोधात गुन्हा दाखल होताच एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील रेनवडी गावातील पुर्वेला कुकडी नदीच्या काठावर दिवसा निर्मनुष्य होणारी ही वस्ती अन्याय अत्याचाराचे ठिकाण बनवताना दिसते येथील विवाहिता सौ.वैशाली पवन शिंदे (२७)हि रेनवडीची कायमची रहिवासी असुन तेथे ती तीन मुले सासु सासरे एकत्र राहतात हि वस्ती नदीच्या कडेला एकांतात आहे तिचे पती थापलिंग नागापूर ता.जुन्नर ग्रामपंचायत कार्यालयात कारकुन म्हणून कामाला आहे.सकाळी पती कामाला निघून जातात पाठोपाठ सासु देखील कामाला निघून जाते मुले शाळेत जातात मात्र सासरे हे सतत घरी असतात दुपारी निर्मनुष्य होणाऱ्या या वस्तीवर विवाहिता आणि सासरे एकटेच राहतात अशावेळेस सासऱ्याच्या असभ्य हालचाली सुरू होतात व त्यांच्या मनातील सुप्त इच्छा जागृत होऊन तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन सासऱ्याकडून होत आहे सासरे मोबाईलवर कायम अश्लिल व्हिडिओ पाहतात आणि स्क्रीन तिला दिसेल अशा प्रयत्नात ते असतात मी एक संस्कारी स्त्री आहे असे विवाहितेचे म्हणणं आहे हा सर्व बिभत्स प्रकार तिला सहन न झाल्यामुळे तिला घर सोडायला त्यांनी भाग पाडले असा आरोप विवाहितेने पोलिसांना दिलेल्या माहितीत केला आहे याबाबत विवाहितेने पारनेर पोलिस ठाण्यात धाव घेतली असता पोलिसांनी तिच्या अर्जाची बोळवण केली होती.पोलीसांच्या अकार्यक्षमतेमुळेच हे प्रकरण ताणले गेले होते तिचे पती शासकीय सेवेत असल्याने पोलिसांनी विवाहितेस उडवाउडवीची उत्तरे दिली होती.अखेर विवाहितेने भरोसा सेलच्या मदतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मदतीची याचना केली.भरोसा सेलच्या लेखी पत्राद्वारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक वर्षापासून हि विवाहिता माहेरात कन्हेर पोखरी येथे राहतेय.रेनवडीच्या त्या रानच्या वस्तीवर सासरे यांच्याकडून तिच्यावर प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता आहे आहे आरोपी बाळू दुर्गा शिंदे यास गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची नागरिक दबक्या आवाजात चर्चा करतात.नंतर अनेकदा विवाहिता रेनवडी येथे आली असता आरोपी बाळू दुर्गा शिंदे सौ.अलका बाळू शिंदे पवन बाळु शिंदे यांनी तिला बेदम मारहाण केली व घरात येवू दिले नाही घरात यायचे असेल तर माहेर कडून पाच लाख रुपये घेऊन ये असा आरोप विवाहितेने कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत केला आहे.याबाबत जिल्हा पोलीसांच्या आदेशानुसार आणि भरोसा सेलच्या लेखी पत्रान्वे अहमदनगर कोतवाली पोलिस ठाण्यात पोलीसांनी आरोपी सासरे बाळू दुर्गा शिंदे (वय५०) सासू अलका बाळू शिंदे वय (४५) पती पवन बाळु शिंदे (वय३२) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता(बीएन एस), २०२३ ११५(२) २(५) ३५१(२) ३५२ ८५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास जिल्हा पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार योगेश दिलीप कवास्ते हे करीत असुन आरोपी गुन्ह्यांची खबर लागताच फरार झाले आहेत.