साई पुण्यतिथी उत्सवानिमित्त चेन्नई वरून सुमारे 32 दिवसाचा प्रवास करत 32 पदयात्री पंधराशे किलोमीटर अंतर कापत पायी साईदर्शनाला आले शिर्डीत! संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवाशंकर यांनी सर्वांचे केले स्वागत!
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
शिर्डी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त चेन्नई येथून 32 साईपदयात्री साई पालखी घेऊन 32 दिवसाचा प्रवास करत सुमारे पंधराशे किलोमीटर पायी चालत साई दर्शनाला शिर्डीत आले आहेत. त्यांचे साई संस्थांनच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी सर्वांचे शाल देत स्वागत केले.
शिर्डी येथे दररोज श्री साईबाबांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने साईभक्त विविध वाहनातून, रेल्वे ,विमानातून येत असतात .त्याचप्रमाणे अनेक साईभक्त हे पायी शिर्डीला श्री साई दर्शनासाठी येत असतात. सण उत्सवाच्या वेळी पायी शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांची मोठी संख्या असते.
राज्यातून ,परराज्यातून मोठ्या संख्येने साई पालख्या ,साई पदयात्री शिर्डीला साई दर्शनासाठी येत असतात. शिर्डीला तीन दिवस विजयादशमीला श्री साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव साजरा होत आहे. या श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त अनेक साई पालखी व साई पदयात्री शिर्डीत येत आहेत, येणार आहेत.
या पदयात्रीप्रमाणेच श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त चेन्नई येथून 32 पदयात्री हे श्री साईबाबांची पालखी घेऊन शिर्डीला आले आहेत . साईबाबांच्या दर्शनासाठी थेट चेन्नई येथून 32 पदरात्री शिर्डीत आल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी त्यांचे स्वागत केले. श्रीसाईशाल टाकत त्यांचा सत्कार केला.यावेळी संस्थांनचे प्रशासकीय अधिकारी
राजतिलक बागवे ,जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते. श्री साई कृपेने आपण चेन्नई वरून शिर्डीला पायी सुखरूप पणे आलो .त्यामुळे मनाला मोठा आनंद व समाधान मिळत असल्याचे यावेळी या चेन्नई येथील साई पदयात्रींनी सांगितले.