राहाता येथे माजी सैनिक संघटनेच्या वतीने ७६ वा भारतीय सेनादिन साजरा.
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्यूज नेटवर्क डिजिटल मिडिया
राहाता (सत्तेचा महासंग्राम न्युज)
येथील माजी सैनिक संघटनेच्या वतीने ७६ वा भारतीय सेना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या सर्व सैनिकांना याप्रसंगी श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
भारत देशाच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या राहाता तसेच तालुक्यातील माजी सैनिकांनी भारतीय सेनेचा ७६ वा वर्धापन दिन राहखता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये साजरा केला.याप्रसंगी माजी सैनिक भानुदास गाडेकर व साईयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करीत संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
संघटनेचे सचिव मेजर सुनील देशमुख यांनी सांगितले की भारतीय सेनेच्या देशासाठी शौर्य गाजवलेल्या व देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांसाठी दरवर्षी १५ जानेवारीला सेनादिन साजरा केला जातो . याप्रसंगी सत्कारमूर्ती डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे म्हणाले की भारतीय सेनेमुळे आपण आज पावतो सुखरूप जीवन जगत आहोत .सेना दिनाच्या निमित्ताने भारतीय सेनादलातील आजी व माजी सैनिकांचा गौरव करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे .राष्ट्रप्रेम असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दर दिवाळीला सीमेवर जाऊन सैनिकांबरोबर सण साजरा करतात. माजी सैनिक मेजर भानुदास गाडेकर म्हणाले की भारतीय स्वातंत्र्याच्या नंतर १५ जानेवारी १९४८ रोजी भारताच्या रक्षणाची जबाबदारी सेनेकडे देण्यात आली. त्यावेळीचे पहिले अधिकारी जनरल करी अप्पा व जनरल मानिकशॉ यांच्याकडे ही जबाबदारी सुपूर्त करण्यात आली म्हणून हा दिवस दरवर्षी सेना दिन म्हणून साजरा केला जातो. राहाता तालुक्यात २०० पेक्षा अधिक माजी सैनिक आहेत. या माजी सैनिकांनी आपली नागरिकांप्रति जबाबदारी म्हणून देश, राष्ट्र तसेच गाव पातळीवर समाज उपयोगी काम करावे असे आवाहन केले.
याप्रसंगी देशासाठी बलिदान दिलेल्या सर्व सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करून प्रतिज्ञा वाचन केले. व्यासपीठांसमोर देश प्रेम दर्शवणारी सुंदर रांगोळी काढणाऱ्या वैशाली क्षीरसागर या मुलीचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष मेजर फ्रान्सिस भारुड उपाध्यक्ष मेजर अरुण टिळेकर यांचे सह मोठ्या संख्येने माजी सैनिक उपस्थित होते. मेजर देशमुख यांनी आभार मानले.