एकलव्य पैठणी केंद्रास छाछरा तन्वीरजी काजी यांची सदिच्छा भेट …
राहाता (सत्तेचा महासंग्राम न्युज)
एकलव्य सामाजिक संस्थेच्या एकलव्य पैठणी केंद्रास ॲक्शन एड या सामाजिक संस्थेच्या आंतरराष्ट्रीय संचालक माननीय संदीपजी छाछरा तन्वीरजी काजी यांनी सदिच्छा भेट देऊन केंद्राच्या कामकाजाची माहिती घेतली एकलव्य संघटनेचे संस्थापक शिवाजीराव ढवळे यावेळी उपस्थित होते.
सप्टेंबर 23 मध्ये ॲक्शन एडच्या सहकार्याने सदर केंद्र सुरू करण्यात आले होते सहा महिन्यात या केंद्रात 20 ते 22 युवक युवती पैठणी विणकाम शिकले आहेत जे यापूर्वी शेतमजुरी करत होते ते आज विनकामाचे कौशल्य आत्मसात करून महिना पंधरा ते वीस हजार रुपये मजुरी कमवत आहेत यापैकी 15 कारागीर संस्थेतच विणकाम करून आपला उदरनिर्वाह भागवत आहेत अशी माहिती संस्थेचे सचिव किरण ठाकरे यांनी दिली.
यावेळी श्री संदीप छाछरा यांनी कारागिरांना विविध प्रश्न विचारून कामकाजाची माहिती घेतली यापुढे अशी प्रशिक्षण केंद्र आणखी तयार करण्यात मदत करण्याचे आश्वासन देऊन सर्वांचे अभिनंदन केले यावेळी उपस्थितांचा सत्कार करण्यात आला.