शिक्षणाबरोबर व्यवसायिक ज्ञान अवगत केले पाहिजे अशोक उद्योग समूहाच्या संचालिका मंजुश्रीताई मुरकुटे
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम न्युज)
-मुलींनी शिक्षणाबरोबर व्यवसायिक ज्ञान ,अवगत केले पाहिजे ,त्यामुळे मुली उद्योग व्यवसाय करून, स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहतील ,अशी प्रतिपादन अशोक उद्योग समूहाच्या संचालिका मंजुश्रीताई मुरकुटे यांनी केले ,
टाकळीभान येथे युवक नेते सिद्धार्थजी मुरकुटे, व अशोक उद्योग समूहाच्या संचालिका मंजुश्रीताई मुरकुटे , यांनी सनशाईन ब्युटी पार्लरला नुकतीच सदिच्छा भेट देऊन, शुभेच्छा दिल्या, यावेळी सिद्धार्थ मुरकुटे यांचा सत्कार पुण्यनगरीचे ज्येष्ठ पत्रकार दिलीपराव लोखंडे, यांच्या हस्ते केला, तर सौ,मंजुश्रीताई मुरकुटे, यांचा सत्कार सौ मीनाताई लोखंडे, यांच्या हस्ते केला,
यावेळी सनशाइन ब्युटी पार्लरच्या नेहा लोखंडे , ग्रामपंचायतचे सदस्य सुनील बोडखे, लोकमतचे पत्रकार अशोकराव रणनवरे, मयुर लोखंडे,आदी उपस्थित होते,